Pune : राहण्याकरिता उत्तम दर्जाचे शहर, सर्वेक्षणात नागरी सहभाग महत्वाचा – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – नागरिकांना रहाण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत, यादृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता अधिक आहे, याबाबत केंद्र सरकारकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार भारतातील विविध शहरे स्पर्धात्मक व गुणात्मक दृष्ट्याही प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने पुणे मनपाचे विविध विभाग व अन्य स्तरावरून नागरी सहभागकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी दि. २९ फेब्रुवारीपर्यंत मनपाच्या अधिकारी व सेवकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून नागरी सहभाग महत्वाचा असल्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेतील सर्व खातेप्रमुख यांची आढावा बैठक घोले रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समिती हॉलमध्ये मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. याप्रसंगी अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

“राहण्यासाठी उत्तम दर्जाचे शहर”, सर्वेक्षण बाबत आढावा घेण्यात आला. डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी याप्रसंगी सविस्तर माहिती दिली. विविध विभागांचे वतीने करण्यात येत असलेल्या कामकाज संदर्भात आढावा घेण्यात आला.
यामध्ये अंदाजपत्रक तरतुदी, कायदेशीर बाजू, अशा महत्वपूर्ण बाबींवर शेखर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.