Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ होणा-या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्याचा रविवारी उद्रेक होऊन नागरिकांनी असहकार करत वाहतूक कोंडी फोडली. टोलच्या नावाखाली पैसे घेऊनही नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. 

टोल नाक्यावरील दुर्तफा एक किलोमीटर अंतरापर्यंत गाड्यांच्या लांबच रांगा लागलेल्या असतात.  जिथे वाहनांना पाच मिनिटांचा वेळ लागणे आवश्यक आहे.  तिथे तासाभराचा वेळ वाया गेल्याने ताटकळत बसावे लागत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून रविवारी सामाजिक कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 टोलच्या नावाखाली पैसे घेऊन नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करत सर्व वाहने विना टोल सोडण्यात अली.  3 मिनिटांच्या वर वाहने थांबली तर टोल माफ असल्याच्या सूचनांचा विचार प्रशासनाने करावा. यापुढेही हे शांततापूर्ण असहकार चालूच राहील. असे वाहनचालकांनी सांगितले आहे. रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलासाठी एक मार्गिका मोकळी असावी अशी मागणी रुग्णवाहिकाचालकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.