Pimpri news: पाळीव कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक त्रस्त !

पाळीव कुत्र्यांच्या सार्वजनिक ठिकाणी शौचाला बसविण्यावर निर्बंध आणन्याची नागरिकांकडून मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिक कुत्री पाळतात. या कुत्र्यांना सकाळी, संध्याकाळी बाहेर फिरायला आणले जाते. सार्वजनिक रस्त्यावर घाण करतात. त्याचा दुर्गंध सुटतो. त्यासाठी पालिकेने  काही नियम बनविणे आवश्यक आहे. सायंकाळी ही कुत्री भुंकतात. त्यामुळे झोपमोड होत असल्याच्या तक्रारी करत महापालिकेने कुत्री पाळण्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच श्वानप्रेमींनी जबाबदार नागरिकासारखे वागावे अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे.

चिंचवड कृष्णानगर येथील  प्रभाकर अहेर म्हणाले,
लोकांना अनेक छंद असतात. पाळीव कुत्री रात्री बेरात्री केव्हाही भुंकतात. झोप उडवतात. आधीच आमच्या आजूबाजूला भटकी कुत्री आहेत. त्यांचा आवाज आला की पाळीव कुत्री आणखी जोराने भूकंतात.  सकाळी  सार्वजनिक जागी एखाद्या घराच्या गेट समोर पाळीव कुत्र्यांचा कार्यक्रम उरकला जातो. अतिशय दुर्गंधी असते. पालिकेने यावर नियंत्रण आणले पाहिजे.

शाहूनगर येथील नितीन चव्हाण म्हणाले, परदेशात
कुत्री पाळणाऱ्या लोकांना बाहेर कुत्र्याबरोबर फिरताना पिशवी घेऊन बाहेर पडावे लागते. तसा कायदा आहे. आपल्या येथे पालिकेची परवानगी न घेता  8 ते 9 हजाराची  कुत्री पाळतात. त्यांच्यावर हजार दोन हजार रुपये खायचा खर्च करतात आणि स्वतःच्या घरात  स्वच्छता ठेवणारे मनपाच्या जागेत परिसरात हगमुत करतात. त्यासाठी पालिकेने  काही नियम बनवावेत. मोठ्या लोकांनी कुत्री पाळण्यापेक्षा  गरिबांच्या मुलावर खर्च करावा.

चिंचवडगांवतील माकपचे कार्यकर्ते बाळासाहेब घस्ते म्हणाले, आधीच भटकी कुत्री शहरात लोकांना चावा घेत आहेत. अनेक श्वानप्रेमी संकरित देशी विदेशी कुत्री पाळतात. स्वतःचा  छंद किंवा घराचे रक्षण होईल म्हणून कुत्री पाळायची. त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसते. बऱ्याच पाळीव कुत्र्यांना बाजारातील बेल्ट आणून बांधतात आणि सर्वाना असे वाटते की पालिकेने परवाना दिला आहे. श्रीमंतांनी कुत्री पाळावीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हीच कुत्री भयंकर भुंकतात. इमारतीच्या पिलरवर श्यू करतात. खेळण्याच्या  जागा, गार्डन येथे घाण करतात. त्यासाठी नियमावली असली पाहिजे.

चिखली राजेशिवाजीनगर येथील  जयश्री देवकते म्हणाल्या, कुत्री आणि मांजरे शेतामध्ये किंवा शेतकऱ्याच्या घरामध्ये उपायोगाची आहेत. नागरी वस्तीमध्ये सोसायट्यामध्ये पदाधिकाऱ्यांची परवानगी न घेता अनेक श्वानप्रेमी कुत्री  पाळतात. पाळीव कुत्र्यामुळे रेबीज होऊ शकतात. कुत्रं चावलं तर 1300  रुपयांची तीन इंजेक्शन घ्यावी लागतात. कुत्री कशी देखभाल करावीत.  याला प्राणी हक्क कायद्याप्रमाणे नियम आहेत की नाहीत. इतरांना त्रास होणार नाही. सार्वजनिक जागेत घाण होणार नाही.याची जबाबदारी कोणाची आहे? महापालिकेसमोर कायदेशीर अडचणी आहेत. प्राणी हक्क कायद्यानुसार कुत्र्यांना जप्त केले. तर त्यांना मारता येत नाही. त्यांना सांभाळून ठेवावे तर आणखी अवघड आहे. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या  त्रासामुळे नागरिक तक्रारी करत आहे. प्रशासन हतबल आहे. श्वानप्रेमींनी जबाबदार नागरिकासारखे वागावे.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, कुत्री पाळण्यासाठी नागरिकांनी परवाना घ्यावा. अन्यथा पालिका दंड आकारेल. अशा प्रकारची नियमावली करण्याचे काम सुरू आहे. 50 टक्के नियमावली पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात स्थायी समिती समोर मान्यतेसाठी नियमावली  ठेवणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.