Pimpri News : शहरात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात 

एमपीसी न्यूज – शहरात ठिक ठिकाणी 72 वा प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

प्रजासत्ताक दिनी सकाळी झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,‍ स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, विलास मडिगेरी,‍ शैलेंद्र मोरे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या सारिका सस्ते, मिनल यादव, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार,

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, अजय चारठणकर, आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मंगेश चितळे,  नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

निगडीतील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वाला धरूनच भारतीय नागरिकाचे धोरण असले पाहिजे. भारतीय संविधानाचे आकलन सुद्धा चांगले झाले पाहिजे स्वातंत्र्य आणि समता व बंधुता या विचारांना घेऊन आपण दैनंदिन जीवनात काम केले पाहिजे असे मत डिसले यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्राचार्य वैभव फंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे अमोल गोरखे, समीर जेऊरकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते तसेच, ऑनलाईन माध्यमातून दोन हजार विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते आकुर्डी प्राधिकरणात ध्यवजारोहन करण्यात आले. यावेळी शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे आणि शाम अगरवाल, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, हरीदास नायर, भाऊसाहेब मुगूटमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, युवक कॉंग्रेस सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, मेहताब इनामदार, विश्वनाथ खंडाळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, ॲड. अनिरुध्द कांबळे, शोभा पगारे, विशाल कसबे, संदेश बोर्डे, स्नेहल गायकवाड, निता चामले, प्रतिभा कांबळे, ऋषिकेश थोरात, शैलेश अनंतराव आदी उपस्थित होते.

मोरेवस्ती येथील ज्ञानदा प्राथमिक विद्या मंदिरात भोसरी विधानसभा  शिवसेना समन्वयक सर्जेराव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी  शाळेच्या मुख्याध्यापक करपे मॅडम, विभागप्रमुख सतीश डीसले, शाखाप्रमुख आनंद हिंगे, कावळे , माने, चोरगे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमात मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात झाली.

मोशीतील आंबेडकर नगर, नेहरूनगर व स्मृतिवन याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ध्वजारोहण करून राष्ट्रिय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

संत तुकाराम नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ याठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. जेष्ठ पत्रकार, गुणवंत कामगार शिवाजी शिर्के व  मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड व  सुदाम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दापोडीतील स्मार्ट किड्स स्कुल याठिकाणी संदिप गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र यादव, राम उप्पार, अँलेक्स आप्पा मोझेस, विशाल जाधव, दशरथ तलवारे,प्रशांत सांगळे, शिलवंत सुर्यंवंशी, अजित यादव, रोहित घोंगडे, अक्षय भोसले, आकाश वाल्मिकी, आशिष वाल्मिकी,राजकिरण गणवीर, मल्लिकार्जुन गायकवाड, शाहरुख शेख, संदिप पाटील आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.