Pimpri : शहराचा गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.14) शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे. 

सेक्टर क्र. 23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद राहणार आहे.

त्यामुळे गुरुवारी होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस -या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. 15) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.