Pimpri : मकरध्वज यादव यांची शहर सेवादल संघटकपदी निवड 

एमपीसी न्यूज – शहर कॉंग्रेसचे सचिव मकरध्वज रामकवल यादव यांची पिंपरी चिंचवड शहर सेवादलाच्या मुख्य संघटक (अध्यक्ष) पदावर निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांच्या मान्यतेने सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी नुकतेच यादव यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

मकरध्वज यादव 2009 सालापासून कॉंग्रेसमध्ये कार्यरत असून डिफेन्डर स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक, निळकंठेश्वर प्रतिष्ठान आणि निळकंठेश्वर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे आणि सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे यांनी मकरध्वज यादव यांचा शहर सेवादल संघटकपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.