Maharashtra Political Crisis : शहर शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, बंडखोरांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरली नाही

पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर कडाडले

एमपीसी न्यूज – पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झाला. पुणे शहर शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला. सर्व शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

गुवाहाटीत पळून गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रात (Maharashtra Political Crisis)  येऊन तोंड दाखवायला जागा उरली नाही, हे त्यांना कळून चुकले आहे, म्हणून ते आम्ही शिवसेना सोडली नाही असे म्हणतात, असे अहिर म्हणाले.

सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये रविवारी (दि.26) झालेल्या या मेळाव्याला शहरातील मोठ्या संख्येने शिवसेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश बोडके, रामभाऊ पारिख, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बावर, अविनाश साळवे, प्रशांत बधे, सविता मते, कल्पना थोरवे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, वैभव वाघ हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, “गुवाहाटीत पळून गेलेल्या आमदारांच्या नशिबी निरुत्साह आल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या (Maharashtra Political Crisis)  परिस्थितीमध्ये पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे कार्यकर्त्यांनी बळ द्यावे. काही मंडळींनी घर तोडण्याचे काम केले, आमदार विकत घेतले; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे घेऊ शकत नाही. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून या, मग सांगा, असे आव्हान त्यांनी या आमदारांना केले. पुणे शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून सर्वजण एक असल्याचे दाखवून दिले आहे.”

Worker Murder Case : बावधान येथील बांधकाम कामगारचा खून

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसैनिक जागेवरच आहेत

“आमदार फोडाफोडीमागे भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना या देशात विरोधक गिळंकृत करावयाचे आहेत म्हणून त्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. देशात सत्तेच्या माध्यमातून त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. कोणी कुठेही गेले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसैनिक जागेवरच आहेत. हा विचार कोणी विकत घेऊ शकत नाही. संकटाचा समर्थपणे एकत्रित मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. या संकटातून आपण बाहेर पडून भगवा फडकवू” असा विश्वास मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.