Pimpri: शहराचा पाणीपुरवठा उद्या विस्कळीत राहणार 

एमपीसी न्यूज – चिंचवड गुरुत्व वाहिनीवरील चिंचवड गावातील चैतन्य सभागृहासमोरील तसेच पिंपरी येथील तपोवन रस्त्यावरील पाणीगळती रोखण्यासाठी उद्या (गुरुवारी)सकाळी अकरा वाजता दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा उद्या विस्कळीत राहणार असल्याचे, पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

चिंचवड गुरुत्व वाहिनीवरील चिंचवड गावातील चैतन्य सभागृहासमोरील तसेच पिंपरी येथील तपोवन रस्त्यावरील पाणीगळती थांबविण्यासाठी उद्या (गुरुवारी) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड गुरुत्व वाहिनीवरील दुपारी आणि सध्याकाळी पाणीपुरवठा असलेल्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. या गुरुत्व वाहिनीवरील संध्याकाळी पाणी पुरवठा होणा-या भागास जेथे शक्य आहे. त्या परिसरात सकाळी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीचा भाग, चिंचवड, पिंपळेसौदागर, वैदूवस्ती, सुदर्शननगर, पिंपळेगुरव, सांगवी, दापोडी परिसरातील देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.