BNR-HDR-TOP-Mobile

Ckakan: पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस ठाण्यात मारहाण; दोघांना अटक

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दोन भावांनी मिळून पोलीस उपनिरीक्षकला पोलीस ठाण्यातच लाथांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी शनिवारी (दि.२३) दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्रमोद रामकृष्ण कठोरे असे मारहाण झालेल्या फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी कल्लू नागेंद्र डुबे (वय २५) आणि सोनू नागेंद्र डुबे (वय २१, दोघे रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी यांच्या वडिलांना चाकण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री दोघे आरोपी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी उपनिरीक्षक कठोरे पोलीस ठाण्यात हजर होते. तू माझ्या वडिलांना पोलीस ठाण्यात का घेऊन आला? तुला माहितीत नाही का मी कोण आहे? असे म्हणत दोघांनी कठोरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. तसेच कटोरे यांना खाली पाडत लाथांनी मारहाण केली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे याचा अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.