CKP Community : कायस्थांच्या एकविरा देवी उत्सवामुळे नवी प्रेरणा मिळाली- अर्जुन देशपांडे

एमपीसी न्यूज : कायस्थांच्या श्री एकविरा देवी उत्सवामुळे (CKP Community) आपल्याला एक नवी प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन सध्या देशभर गाजत असलेले तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी केले आहे.

सीकेपी संस्थेतर्फे`एक दिवस कायस्थांचा’ एकविरा गडावर रविवारी (दि.27) उत्सव पार पडला. संपूर्ण देशातील सीकेपी समाजातील मंडळी या उत्सवासाठी एकविरा गडावर जमली होती. यंदा प्रथमच गुणवंतांचा गौरव समारंभही करण्यात आला. उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे, मुंबईचे विख्यात विधीज्ञ अ‍ॅड. अजित ताम्हाणे, उत्सवाचे संयोजक तुषार राजे, रघुवीर देशमुख, राजेश देशपांडे, राममारुती संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी इत्यांदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : पॅशन, प्रॅक्टिस आणि पोटेन्शियल यामुळे आत्मसन्मानाची झळाळी वाढते – डॉ. कविता तोटे

उत्सवाच्या आदल्या दिवशी एकविरा देवीचा भाऊ बहिरीदेव याला आमंत्रण देण्यात आले. सकाळी सहा पासून उत्सवास प्रारंभ झाला. सकाळी 6 वाजता एकविरा देवीचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर अकरा जोडप्यांसह होमहवन करण्यात आले. एकविरेचा गोंधळ कमालीचा लोकप्रिय ठरला. शिवाय भक्तीसंगीताचाही कार्यक्रम झाला. यावेळी  नामवंतांचा गौरव करण्यात आला.(CKP Community) डॉ. विजयकुमार डोंगरे (पद्मश्री), निखिल चिटणीस (एअर मार्शल), प्राजक्ता रणदिवे (न्यायमूर्ती), आरती देशपांडे (उद्योजिका), शैलाताई फासे-मथुरे (उद्योजिका व समाजसेविका), दिपक देशपांडे (अतिरिक्त आयुक्त-आयकर), संजयराज गौरीनंदन (गायक संगीतकार), निलेश वैद्य (संचालक अपना बाजार), डॉ. राजेश गुप्ते (वैद्यकिय सेवा), दिलीप गडकरी (साहित्यिक समाज कार्यकर्ते), हेमभुषण कुळकर्णी (चांद्रसेनिय कायस्थ प्रभु गौरव गाथेचे संकलक), जयदिप कोरडे (तरुण तडफदार समाज कार्यकर्ते) सुबोध देशपांडे (टेबल टेनिस) इत्यांदींचा गौरव करण्यात आला. महाआरतीने उत्सवाची सांगता करण्यात आली.

या  उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सीकेपी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, रघुवीर देशमुख, राजेश देशपांडे, पुरुषोत्तम फडणीस, जयदिप कोरडे, राहुल देशपांडे, संजय कर्णिक, चंद्रशेखर राजे, अशोक कुळकर्णी, निलेश गुप्ते, मंदार कुळकर्णी, मिलिंद राजे, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, आदित्य देशमुख, सागरिका कर्णिक, गौरी मथुरे, अंजली प्रधान, विभा कर्णिक इत्यांदींसह अनेकांनी मेहनत घेतली. कार्यवक्रमाचे सूत्रसंचालन प्राची गडकरी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.