Pimpri : सर्वच नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याबाबतचा नागरिकांचा संभ्रम दूर करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम तरतुदीनुसार लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली(TDPS) अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना (AYY आणि PHH) धारकांना 5 किलो प्रति व्यक्ती प्रति महिना ,3 महिन्यांकरिता म्हणजेच एप्रिल ते जून 2020 पर्यंत विनामूल्य धान्य देण्याचे जाहीर केले आहे .परंतु नागरिकांमध्ये केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला विनामूल्य धान्य तीन महिन्यांकरिता देणार असा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अशी विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.
देशात कोरोना साथीने सर्व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे नागरिक भयभीत झाले आहेत.  देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 3000 पर्यंत गेली आहे . नागरिकांना सुद्धा खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यासाठी नागरिकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये हे खूप खटाटोप करावा लागत आहे देशातील लॉक डाऊन मुळे कारखाने, व्यवसाय, दुकाने, छोटे व्यापारी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री  गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत भारत सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने 30  मार्चला परिपत्रक काढून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम तरतुदीनुसार ‘लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली’ अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना (AYY आणि PHH) धारकांना 5 किलो प्रति व्यक्ती प्रति महिना ,3 महिन्यांकरिता म्हणजेच एप्रिल ते जून पर्यंत विनामूल्य धान्य देण्याचे जाहीर केले आहे. परंतु राज्यातील नागरिकांमध्ये केंद्र सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला धान्य विनामूल्य तीन महिन्यांकरिता देणार असा संभ्रम निर्माण झाला आहे हा संभ्रम दूर करण्याची विनंती बाबर यांनी केली आहे.
लॉकडाऊन च्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती खूप दैनंनिय झाली आहे. भारतातीय नागरिक सुज्ञ आहेत व
अशा परिस्थितीत अति उत्पन्न असलेले नागरिक देशाला नक्कीच सहकार्य करतील. त्यामुळे सर्वच नागरिकांना विनामूल्य धान्य तीन महिन्यांसाठी मोफत द्यावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळेल व  उपासमार होणार नाही अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.