Crime News : कॉलेजमध्ये दोन गटात हाणामारी; पोलीसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कॉलेजमध्ये झालेल्या चेष्टा मस्करीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार म्हाळसाकांत महाविद्यालयाजवळ आकुर्डी व उर्सुला शाळेजवळ, निगडी येथे शुक्रवारी (दि.26) घडला आहे.

अथर्व संदीप केदारी (वय18, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार साहिल जाधव (रा.किवळे), कार्तिक कट्टमणी (रा. देहूरोड) आणि पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या विरोधात कार्तिक नामदेवराव कट्टमणी (वय 18, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अथर्व संदीप केदारी, प्रतीक शिवाजी पाटील, अजय जाधव, उदय कदम (सर्व रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अथर्व आणि कार्तिक यांचे गट एकाच कॉलेजमध्ये शिकत आहेत. कॉलेजमध्ये त्यांच्यात झालेल्या चेष्टा मस्करीवरून त्यांचा वाद वाढला.शुक्रवारी दुपारी पाऊण वाजता कार्तिक आणि त्याच्या मित्रांनी अथर्व आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व दगडाने मारहाण केली.त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये निगडी येथील उर्सुला शाळेजवळ कार्तिक आणि त्याच्या मित्रांनी लाकडी बांबूने, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कार्तिकला जखमी केले.त्यानंतर कार्तिकला एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याला चिखलीच्या दिशेने नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.