Classic Movie Festival On Zee Talkies: झी टॉकिजची नवी देन, ‘दशकातील दहा’

Classic Movie Festival On Zee Talkies: Zee Talkies' new gift, 'Ten of the Decade' प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एमपीसी न्यूज- बाहेर रिमझिमणारा पाऊस, हातात चहाचा वाफाळता कप, सध्या घरातच असलेले सर्वजण आणि त्यातच झी टॉकीजवरील दर्जेदार चित्रपट. या पावसाळ्यात झी टॉकीज खास आपल्यासाठी घेऊन येत आहे मागील दशकातील तुमच्या आठवणींशी जोडणारे खास 10 ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट, ‘दशकातले दहा जुलै मध्ये पहा’.

यात 6 जुलै रोजी अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘काकस्पर्श’ हा 8 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘रंपाट’ हा चित्रपट 9 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 10 जुलै रोजी हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे. ‘नाळ’ हा चित्रपट 13 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘लय भारी’ 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.

‘नशीबवान’ हा चित्रपट 15 जुलै रोजी तर 2015 साली ‘देऊळ बंद’ या चित्रपटाद्वारे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनात प्रदार्पण केले होते.

या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिका साकारत असून मोहन जोशी, दीपक करंजीकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. 16 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवलची सांगता 17 जुलै रोजी ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाने होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.