Pimpri : कामगारनगरीत स्वच्छतेचा जागर

महापालिका, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महास्वच्छता अभियान;अडीच हजार कर्मचारी, स्वयंसेवकांचे श्रमदान

एमपीसी न्यूज –  पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आज (रविवारी) महास्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे कर्मचारी व धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक अशा सुमारे अडीच हजारजणांनी श्रमदान करीत शहर स्वच्छ केले. मोहिमेत 207 टन कचरा गोळा केला. 41 हजार 471 चौरस मीटरचा परिसर, 207 किलोमीटरचे रस्ते या मोहिमेमध्ये चकाचक करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी सात ते दहा या वेळेत अभियान राबविण्यात आले. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बॉम्बे सिलेक्शन, चिंचवड स्टेशन, वाहतुकनगरी परिसर, खंडोबा माळ ते थरमँक्स चौक, संघवी केसरी कॉलेज ते परशूराम चौक, पिंपरीनगर बी ब्लॉक 1 ते 32 लेन या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामधील चिंचवडेनगर कॉर्नर ते गुरुमैय्या शाळा मार्गे पॉवर हाऊस वॉल कंपाऊड पर्यंत, बिर्ला घाट ते मोरया गोसावी मंदिर, बिजलीनगर पाण्याची टाकी ते इस्कॉन मंदिर, विकासनगर शिंदे पेट्रोल पंप ते मुकाई चौक ते पुनावळे पर्यंतचा परिसर चकाचक करण्यात आला.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एच.ए. मैदान (दोन्ही बाजू), से.नं.16 सीएनजी पेट्रोल पंपामागील मैदान, जाधववाडी, अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील पटांगण, मातेरे कंन्स्ट्रक्शन ते कृषी उत्पन्न बाजार समिती, बो-हाडेवाडी या ठिकाणी तर. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पिंपळेगुरव सुदर्शन चौक ते भगत सिंग चौक, वाघजाई हॉटेल ते छत्रपती बँक रोड, इंदिरा कॉलेज ते पुनावळे सर्व्हिस रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये माई वडेवाला ते बनाच्या ओढ्यापर्यंत आळंदी रोड, लांडेवाडी चौक ते आशिर्वाद मोरी गॅस एजन्सी ते गव्हाणे वस्ती ते सुविधा अपार्टमेंट शीतलबाग या ठिकाणी मोहिम राबविण्यात आली.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर चौक ते कुदळवाडी ब्रिज, आर.टी.ओ. कार्यालय परिसर पूर्णानगर, अंकुश चौक ते रुपीनगर कमान या ठिकाणची तर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील नव महाराष्ट्र शाळा ते रेल्वे गेट डेअरी फार्म, साई चौक, पिंपरी ते पुणे- मुंबई रस्ता, डाल्को कंपनी रोड, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, डांगे चौक ते काळाखडक, काळेवाडी फाटा ते पिंपरी चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सांगवी फाटा ते पी.डब्ल्यू.डी मैदान, नाशिक फाटा ते शीतलबाग सोसायटी (दुतर्फा रस्ता) या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत महापालिकेच्या वाहनांमार्फत कचरा गोळा करण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ के अनिल राॅय,सहायक आयुक्त मनोज लोणकर,अण्णा बोदडे, संदीप खोत, आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ देविदास गोफणे,सहायक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे,बी के. दरवडे, बी. बी. कांबळे, धाकोजी शिर्के, विनोद बेंडाळे, संजय कुलकर्णी आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.