Dehugaon : देहूगाव येथे इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता 

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे इंद्रायणी नदीवरील (Dehugaon) ब्राह्मण घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देहू नगरपंचायत आणि डी वाय पाटील महाविद्यालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नमामि इंद्रायणी सेवा अभियान प्रमुख सोमनाथ मुसुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेवेळी देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदीता घार्गे, देहू नगरपंचायत अध्यक्षा श्रीमती दिवटे, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेवक प्रवीण काळोखे, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

देहू गावातील ब्राह्मण घाटावर नेहमी दुर्गंधी आणि अस्वच्छता असे. नदी स्वच्छतेसाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. त्यामुळे ब्राह्मण घाट स्वच्छ करण्याची मोहीम (Dehugaon) हाती घेण्यात आली. डी वाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भरीव योगदान दिले. विद्यार्थ्यांनी संपूर्ण घाट स्वच्छ करून दुर्गंधीमुक्त केला. नमामि इंद्रायणी सेवा अभियानची यावर्षी नदी वाचवा जीवन वाचवा ही थीम असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share