Pune : ट्रेकिंग पलटण ग्रुपकडून कर्नाळा गडावर स्वच्छता

एमपीसी न्यूज – सरत्या वर्षाला निरोप म्हणून पुण्यातील ट्रेकिंग पलटण ग्रुपने आज रविवारी (दि. २९) रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर स्वच्छता केली.

गडावर प्लास्टिक बाटल्या परत आणणे बंधनकारक असून कडक तपासणी केली जाते. शिवाय डिपॉजिट सुद्धा घेतले जाते. त्यामुळे गड त्यामानाने खूप स्वच्छ दिसला. तरीसुद्धा ट्रेकमार्गावर तीव्र उतारांवर शीतपेय तसेच पाण्याच्या काही बाटल्या तसेच थोडे फार फूड पॅकेट्स पडलेले उचलून कचरा कुंडीत जमा केले गेले.

या स्वच्छता मोहिमेत श्रेया गायकवाड, शिवम गायकवाड, साईनाथ जगदाळे, कुमार खुंटे, खंडू दयाळ, ललित बागल, रविराज थोरात, डॉ मिलिंद गायकवाड आणि डॉ सुरेश इसावे या सदस्यांनी भाग घेतला. ट्रेकचे नियोजन डॉ. सुरेश इसावे यांनी केले. त्यांना डॉ. अनिता धायगुडे आणि डॉ. संदीप गाडेकर यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.