Alandi News : आळंदी मधील कुबेर गंगा ओढा स्वच्छतेचे काम सुरु

एमपीसी न्यूज : आळंदीतील कुबेर गंगा या ओढ्याची पालिका प्रशासना मार्फत पोकलँड मशीन द्वारे साफ सफाई इ.चालू आहे. (Alandi News) बहुतांशी त्या ओढ्या लगत असणाऱ्या रहिवाश्यांनी  तेथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडल्याने या ओढ्याला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

ओढ्यामध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहात असून त्या सांडपाण्या बरोबर कचरा ही वाहत असतो. त्या पाण्याबरोबर वाहत जाणारा कचरा प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच नैसर्गिक रित्या प्रक्रिया करून जेवढे शक्य होईल तेवढे तिथे शुद्ध पाण्याचा प्रवाह कसा वाहीला जाईल यासाठी कार्य होणार आहे.याबाबत माहिती संकिता साळुंखे यांनी दिली.

 

 

PCMC :  महापालिकेची 700 कोटी कराची विक्रमी वसुली

 

सामाजिक कार्यकर्ते आनंदराव मुंगसे म्हणाले जसे येथील ओढ्याची स्वच्छता होत आहे. तसेच या ओढ्या लगत असणाऱ्या आळंदी केळगाव रस्त्यावरील कचऱ्याची ही स्वच्छता वेळोवेळी व्हावी.(Alandi News) आळंदी नगरपालिका व केळगाव ग्रामपंचायत यांच्यात लवकरात लवकर यासंदर्भात बैठक व्हावी व येथील परिसर वेळोवेळी स्वच्छ करण्या बाबतचा निर्णय प्रसाशनाने त्वरित घ्यावा.असे यावेळी ते म्हणाले. कुबेर गंगा ओढ्यातील  स्वच्छतेचे काम पालिका प्रशासना मार्फत चालू आहे.अशी माहिती पालिका कर्मचारी अरुण घुंडरे यांनी  दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.