Pimpri : गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे स्वच्छता अभियान

तरुणांनी घेतली व्यसन मुक्तीची शपथ

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टी प्रणीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे आज (बुधवारी) स्वच्छ भारत अभियान दिन साजरा करण्यात आला. संत तुकारामनगर परिसर चकाचक करण्यात आला.  या मोहिमेत संघटनेच्या 500 च्यावर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान मेळावा देखील घेण्यात आले. तसेच तरुणांनी यावेळी व्यसन मुक्तीची शपथ घेतली.

संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दिनेश पाटील, दीपकशेठ पाटील, अमोल घोरपडे, खाजामिया शेख, बाबासाहेब सोनावणे यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान कायर्क्रमामध्ये संत तुकारामनगर व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर स्वच्छ भारत अभियाननिमित मेळावा घेण्यात आलेला होता.

यशवंत भोसले म्हणाले, महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या जुलूमी राजवटी विरोधात अहिंसाच्या मार्गाने युध्द पुकारून संपूर्ण भारत जुलुमा विरोधात रस्त्यावर उतरविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने निरव्यसनी होऊन तरूणांनी जीवन जगावे.  तरूणांनी असलेले तंबाखू व दारूचे वेसन सोडावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच व्यसनापासून दूर राहण्याची शपथ दिली.

व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होते. तसेच प्लास्टिक वापरल्यामुळे देश उध्वस्त होतो. याकरिता घर जसे स्वच्छ ठेवतो. तसेच देश देखील स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नंदू कदम यांनी केले.अनेक देशामध्ये मी फिरलो असताना कागदाचा तुकडा देखील रस्त्यांवर आढळून येत नाही. प्लास्टिक देखील रस्त्यांवर दिसून येत नाही. त्यांचे देखील आपण अनुकरण करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी जयदेव अक्कलकोटे यांनी स्वच्छता अभियानावर सुंदर कविता सदर केली. संघटनेचे पदाधिकारी करण भालेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.