Chikhali News: मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा क प्रभाग आणि इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शुक्रवार दि.2 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम अआणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत चिखली मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

या मोहिमेत चिखली परिसरातील रस्त्यावर झाडलोट करण्यात आली, सोसायटी परिसरात स्वच्छता करण्यात आली तसेच या भागातील कचरा उचलण्यात आला. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी सूचना फलक परिधान केले होते. स्वच्छतेवर गाणी, घोषणा देण्यात आल्या.

विद्यार्थ्यंनी  रस्त्यालगतचे दुकानदार, रहिवाशी, नागरिक, वाहन चालक, इत्यादीना स्वच्छतेचे महत्व सांगितले. पानटपरी विक्रेत्याना स्वच्छता ठेवण्याची आवाहन केले. रहिवाशांना ओला व सुका कचरा वेगवेगळया टाकण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी पालकांनी नागरिकांनी स्वच्छता करण्याबाबत, प्लॅस्टिक वस्तू न वापरण्याबाबत, ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची तसेच कचरा कुंडीतच टाकण्याची शपथ घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.