Nigdi : मॉडर्न हायस्कूलने दिला स्वच्छतेचा संदेश 

एमपीसी न्यूज – निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यमुनानगर परिसरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता जागृती रॅली काढत स्वच्छतेचा संदेश दिला. स्काऊट गाईडचे शिस्तबद्ध संचलनाचे पालकांनी कौतुक केले. 

ढोल ताशाच्या गजरात सदर जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये ‘स्वच्छ भारत समृद्ध भारत’ ‘एक कदम स्वच्छता की और’ ‘स्वच्छतासे देश का विकास’ ‘स्वच्छ भारत बलशाली भारत’ ‘ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा’ अशा विविध घोषणांनी यमुनानगर परिसर दुमदुमून गेला होता.

शालेय विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. शेवटी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी मॉडर्नचे प्राचार्य सतीश गवळी, विकास पाटील, प्रभाकर मेरुकर, मीनाक्षी मेरुकर, शिवाजी अंबिके, गंगाधर सोनवणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.