Pimple Saudagar : गणेश विसर्जन घाटाची साफसफाई

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असता गणेश विसर्जन घाटाची मात्र साफसफाई करण्यात आली नाही. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी ही दखल घेत महापालिका आरोग्य विभागाकडे संपर्क साधून गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता केली. 

पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदी पात्र परिसर तसेच बाकी सर्व घाट साफसफाई करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली होती. दिलेल्या सूचनांची दखल घेत देवी आई माता व दत्त मंदिर घाट व नदीपात्र परिसर साफ सफाईच्या कामास पालिका आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवात गणेशभक्त गणपती बाप्पाचे थाटात स्वागत करतात. तसेच कोणी एक दिवस तर कोणी दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची पूर्ण श्रद्धेने, सेवाभावाने सेवा करतो मग बाप्पांना निरोप देताना सुद्धा तेवढ्या थाटात, स्वच्छ वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले पाहिजे. या भावनेतून भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी तातडीने आरोग्य विभागास विसर्जन घाट व नदी पात्र साफसफाई करण्याच्या सूचना  देऊन त्या पूर्ण करण्यास सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.