Pune : “पुणे मेट्रो” तर्फे क्लिक व विन सेल्फी कॉंन्टेस्ट 7 ऑक्टोबर पासून

एमपीसी न्यूज – महा मेट्रो, पुणे मेट्रो रेल प्रकल्पाद्वारे पुणेकरांनकरीता पुणे मेट्रो माहिती केंद्र (बालगंधर्व परिसर) येथे सेल्फी कॉंन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पामध्ये जास्तीत जास्ती युवकांना जोडण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन महा मेट्रो तर्फे करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देखील तरुणांना या ठिकाणी मिळणार आहे.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे माहिती केंद्र शहराच्या मध्यभागी संभाजी उद्यान बालगंधर्व परिसर येथे असून या ठिकाणी पुणे मेट्रो रेल प्रकल्पाबाबतची विस्तृत माहिती पुरविल्या जाते ज्यामध्ये तांत्रिक,व्यावसायिक,मुख्य वैशिष्ट्ये,फायदे,स्टेशन मार्ग इत्यादी तसेच प्रकल्पाबद्दल शंकाचे निराकरण माहिती केंद्र मध्ये उपस्थित मेट्रो प्रतिनीधी मार्फत केल्या जाते. पुण्यातील नागरीकांना माहिती केंद्रात जाउन आपल्या “पुणे मेट्रो” बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळू शकतात. पुणे मेट्रोची चमू सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत दररोज माहिती केंद्र येथे उपलब्ध असते.

सेल्फी कॉंन्टेस्ट मध्ये भाग घेण्याकरिता स्पर्धकांना पुणे मेट्रो माहिती केंद्र बालगंधर्व परिसर येथे भेट देऊन मेट्रोच्या प्रतिकृती जवळ सेल्फी क्लीक करून महा मेट्रोच्या फेसबुक किंवा ट्वीटर वर #MeAtApaliMetro & #PuneMetro तसेच[email protected], या ईमेल आयडी वर अपलोड करायची आहे. सर्वोत्कृष्ट सेल्फी अपलोड करणाऱ्या स्पर्धकांना व स्पर्धेमध्ये यशस्वी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहे.

ही स्पर्धा सर्वांकरिता मोफत असून सर्वोत्कृष्ट विजेता पुणे मेट्रो तर्फे ठरविण्यात येईल व तो सर्व स्पर्धकांना मान्य करावा लागेल. सेल्फी स्वतःच्या मोबाईल ने काढून [email protected] या ई-मेंल आयडी वर पाठवावे व जिंकणाऱ्या विजेत्याची घोषणा महा मेट्रो, पुणेच्या फेसबुक पेज वर दररोज करण्यात येईल. ही स्पर्धा दिनांक 7 ते 14 ऑक्टोबर पर्यंत राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.