Pune : हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

229

एमपीसी न्यूज : युनायटेड नेशन इन्व्हॉरमेन्ट प्रोग्रॅमने पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड २०१८  पुरस्कार दिला आहे. महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, अधिकारी सुरेश जगताप यांनी हा पुरस्कार अमेरिकेत जाऊन हा पुरस्कार स्विकारला आहे.

मात्र आता देशात दिल्लीनंतर पुणे शहरात सर्वांधिक प्रदुषण असल्याचे अनेक अहवालात स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेच्या सन २०१८ च्या पर्यावरण अहवालात प्रदुषणामध्ये वाढ होत असल्याचे म्हटले आहे. तरीही पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.

शहरात कचरा कोंडी झाली असताना शहर सोडुन परदेश दौ-यावर गेलेल्या नेत्यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. उरुळी देवाची आणि  फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरा गाडया २३ दिवस आडवुन कचरा कोंडी केली होती. त्यावेळी महापौर परदेश दौ-यावर होत्या. आता कचरा कोंडी असताना शहर सोडुन गेलेले पुरस्कार घेतात अशी टिका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: