Pimpri Fire News : महापालिका इमारतीसमोर क्लिनिकला आग

0

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीच्या समोर एका क्लिनिकला आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 22) पहाटे सव्वापाच वाजता घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका इमारतीच्या समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये एका क्लिनिकला आज पहाटे आग लागली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य केंद्राचा एक आणि प्राधिकरण उपकेंद्राचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत साहित्य जळाल्याने क्लिनिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.