Pune : शहरावर होते 9 ते 12 किलोमीटर उंचीचे ढग! 

Pune : शहरावर होते 9 ते 12 किलोमीटर उंचीचे ढग!

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या दक्षिण पूर्व भागावर बुधवार रात्री 9 ते 12 किलोमीटर उंचीचे तसेच 3 ते 6 किलोमीटर पर्यंत जास्त घनता असलेले ढग मुंबईच्या रडारवर दिसून आल्याची माहिती हवामानशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली.

या जास्त घनतेच्या ढगांमुळेच पुण्यात बुधवारी रात्री अतिमुसळधार पाऊस झाला, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. प्रभुणे यांनी मुंबई रडारवर दिसलेली पुण्यावरील जास्त घनतेच्या ढगांची प्रतिमा ‘ट्विटर’वर शेअर केली आहे.
पुणे शहरावर एवढे मोठे ढग जमा होऊन अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात हवामानशास्त्र विभागाला अपयश आल्याबद्दल सर्वत्र संतापयुक्त आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हवामानशास्त्र खात्याने त्याबद्दल पूर्वकल्पना, इशारा दिला असता तर मोठे नुकसान टळू शकले असते, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.