Pimpri News : शहरात ढगाळ वातावरण, पुढील तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची (Pimpri News) शक्यता वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. पुण्यात आज (मंगळवारी) कमाल तापमान 34.9 अंश तर किमान 16.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

सध्या पश्‍चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.(Pimpri News) यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.

Pune Crime : स्वारगेट परिसरात दहशत माजवणारी सराईत गुंडांची टोळी गजाआड

 

पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मागील काही दिवसांपासून सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन असं वातावरण आहे. (Pimpri News)  त्यामुळे साथीच्या आजारतही वाढ झाली आहे.

 

येत्या शनिवार (दि.18) पर्यंत ढगाळ वातावरण व तुळरळ पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात आपल्या आरोग्याची नागरिकांनी काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.