CM Address To State : कोरोना संपला असे समजू नका, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नको असेल तर वेळीच सावध व्हा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा ‘लॉकडाऊन’ नको असेल तर वेळीच सावध व्हा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खबरदारीचा इशारा आज दिला. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असे समजून वावरू नका. सध्या तरी गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि हात धूवत राहणे हीच त्रिसुत्री आपल्याला पाळावी लागेल असे, आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. पाडव्याला राज्यातील सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे उघडली मात्र याठिकाणी गर्दी न करण्याचे तसेच, येणाऱ्या कार्तिकी यात्रेला गर्दी न करता भक्तीभावाने एकदशी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आतापर्यंत आपण सर्व सण संयमाने साजरे केले. उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला येण्यास मदत झाली. मात्र, सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही तर, तो वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

लसीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.
24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज आहे. लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही. जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा असे, कळकळीची विनंती त्यांनी केली.

लस येईल तेव्हा येईल, कोरोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा. गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाण्याचं टाळा, मास्क परिधान करायचे विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच कोरोना टाळण्याचे उपाय आहेत असे, उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.