CM Address To State : राज्यात उद्यापासून लॉकडाऊन ? मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करणार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (मंगळवारी, दि.13) रात्री 8:30 वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे नेमक्या काय घोषणा करणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.