CM Address To State: 30 जून नंतर लॉकडाऊन उठणार का ? मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

CM Address To State: Will there be a lockdown after June 30? This is the answer given by the CM Uddhav Thackeray गर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाउनचे कठोर नियम पुन्हा पाळावे लागतील. आज मी तुम्हालाच विचारतोय, तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का?

एमपीसी न्यूज- अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण काही गोष्टी सुरु करत आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर कोरोन आ वासून बसला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधताना म्हटलं आहे.

राज्यात पाचव्या लॉकडाउनची मुदत 30 जूनला संपत आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 30 जूननंतर पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. 30 जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे.

तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका.

गर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाउनचे कठोर नियम पुन्हा पाळावे लागतील. आज मी तुम्हालाच विचारतोय, तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का? जर नको असेल तर मास्क लावणं, हँड सॅनिटायझर वापरणं, हात धुवत राहणं, गरज नसेल तर घराबाहेर न पडणं, उगाच गर्दी न करणं हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल.


तुम्हाला लॉकडाउन हवाय का? तुम्ही नियम पाळले नाही तर मात्र लॉकडाउन पुन्हा लागू करावा लागेल, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

सर्व धर्मीयांचे आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची शिमग्या नंतर बोंब सुरु आहे. त्यानंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असं मी म्हणणार नाही. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले.

दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी. आता गणेशोत्सव साजरा होणार आहे, त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत.

त्यामुळे मी सर्वधर्मीयांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच विठूरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे, आणि हे संकट दूर व्हावं म्हणून साकडं घालणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.