CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाली डॉक्टरेट पदवी

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज डी.लिट ही पदवी देण्यात आली आहे. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांना  ही पदवी बहाल (CM Eknath Shinde) करण्यात आली आहे.सामाजिक, आरोग्य आणि आपत्कालीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, डी. लिटसारखी प्रसिद्ध पदवी मला देण्याचं ठरवलं, यासाठी मी या विद्यापीठाचा आभारी आहे. आपला मुलगा जिथे शिकला, त्याच विद्यापीठाकडून डी.लिट पदवी मिळणं गौरवाची गोष्ट  आहे.

 

Pune : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या – चंद्रकांत पाटील

 

आपण घरात बसायचं नसतं ही शिकवण मला बाळासाहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली, कोरोनातही आम्ही काम केलं, जबाबदारीचं पालन केलं. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे बाळासाहेबांचं सूत्र आम्ही पुढे नेलं. मी मुख्यमंत्री झालो तरी मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि (CM Eknath Shinde) उद्याही कार्यकर्ताच असेन.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.