CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला; शिवसेनेचे आमदार-खासदारही जाणार

मुख्यमंत्री 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार देखील अयोध्येत जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

 

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 30 – धूमकेतू कांचन बाबला

 

एकनाथ शिंदे एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आलेली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलेला.(CM Eknath Shinde) अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे.

 

“खरं म्हणजे अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.