Pune : मुख्यमंत्री पुण्यात ; महापालिका पदाधिकारी बाहेर….

एमपीसी न्यूज – महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिले दिड वर्षे स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराज असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुख्यमंत्री फडणवीस पुण्यासाठी वेळ काढत असले तरी, त्यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या महापालिकेच्या कर्वे रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत होणार आहे.

महापौरांसह, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि काही विषय समित्यांचे अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. तर आयुक्त सौरभ राव हे देखील परदेश दौऱ्यावर असल्याने ते सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. खासदार अनिल यांच्या साडेचार वर्षाच्या कामकाजाचे कार्यअहवाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे मात्र महापौरांसाहित पदाधिकारी पुण्यात नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.