Mumbai : राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांची मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग सुरू झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई, पुणे आणि काही बाधित भागासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे. बहुतांशी मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन वाढवावा, यावर एकमत असल्याची माहिती कळतीये.
तर एका राज्यासाठी लॉकडाऊन आणि दुसऱ्या राज्यासाठी लॉकडाऊन शिथील करू नका. सगळ्या देशात एकच प्रणाली वापरली गेली पाहिजे, असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.