Pune: CM ठाकरेंनी घेतला पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

CM Uddhav Thackeray taken review of coronavirus preventive measures of pune division

एमपीसी न्यूज- राज्यातील कोरोना बाबत शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील उपाययोजनांबाबतचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र सद्यस्थिती, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमता नियोजन व सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाढ व उपचार व्यवस्था, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था तसेच प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर विचारात घेऊन तातडीच्या नियोजनासाठी टास्क फोर्सचे चेअरमन सोलापूर येथे जात आहेत. सोलापूरसह संपूर्ण पुणे विभागात ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराचा इतिहास असलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

संस्थात्मक विलगीकरण असलेल्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी तपासणी, शुगर तसेच रक्तदाब तपासणी करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.