CM Uddhav Thackeray Tests Covid Positive : कोरोनाचा पुन्हा शिरकाव! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – राज्यात राजकीय वर्तुळातील सुरू झालेले रणकंदन थांबण्याचे नाव घेईना आणि या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Tests Covid Positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्र काॅंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना कोरोना झाल्याचे सांगितले आहे, परंतु या वृत्ताला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणताच दुजोरा मिळालेला नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण (CM Uddhav Thackeray Tests Covid Positive) झाल्याचे वृत्त सध्या समोर आले आहे. राज्यातील अस्थिर राजकीय वर्तुळात नवनवीन घडामोडी समोर येत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त आल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज अॅन्टिजन टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच वर्षा या निवासस्थानीच आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली, मात्र या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला त्यामुळे मुख्यमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह की निगेटिव्ह हा सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र या संपुर्ण परिस्थितीत खबरदारी म्हणून मुख्यमंत्री ठाकरे सगळ्या बैठका ऑनलाईन पद्धतीने करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde : आमच्या कुठल्याही अटी नाहीत, सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड नाही : एकनाथ शिंदे

दरम्यान, राज्यातील राजकीय समीकरणे कशा पद्धतीने पुढे जाणार यावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे, मात्र या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार असल्याचे काँग्रेस नेते कमलनाथ  यांनी सांगितले आहे. या संपुर्ण घडामोडीवर केवळ राज्याचे नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे, त्यामुळे राजकारणाच्या या रणांगणात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.