Rathani News: निळी पूररेषा, हरित पट्ट्यातील नवीन, वाढीव बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकावरील कारवाई पुन्हा सुरु केली. प्रभाग क्रमांक 27 रहाटणी कोकणे कॉर्नर येथील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. निळी पूररेषा, हरित पट्टा भागातील वाढीव आणि नव्याने झालेली 16 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधील नढे कॉर्नर, शिवलीला कॉलनी, शिवालय, शिवधाम कॉलनी, तापकीर मळा परिसर, व्यावासायिक, निळी पूररेषा, हिरत पट्टा भागातील 16 वाढीव आणि नव्याने झालेल्या आरसीसी, पत्राशेड, वीटबांधकाम इत्यादी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. 13 हजार 461 चौरस फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

3 जेसीबी, 1 डंपर, 12 मजूर, 2 ब्रेकर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.