CNG Price Hike : सीएनजी दरवाढीचा रिक्षा चालकांकडून निषेध; पाच महिन्यात 29 रुपयांची दरवाढ

एमपीसी न्यूज :  रिक्षा चालक व सर्वसामान्य नागरिकांची अनेक वाहने सीएनजीवर धावतात. पिंपरी चिंचवड, पुणे, चाकण, तळेगाव, हिंजवडी या परिसरातील सीएनजी गॅसचा भाव बुधवारी सहा रुपयांनी वाढवत 91रुपयांवर गेला. गेल्या पाच महिन्यात तब्बल 29 रूपयांची वाढ झाली. लवकरच हा आकडा शतक पार करेल? याची भितीही नागरिकांमध्ये आहे. ही दरवाढ, प्रचंड महागाई व बेरोजगारीच्या (CNG Price Hike) संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व रिक्षा चालकांत तीव्र नाराजी असून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

 

 

एकीकडे गॅसचे दर वाढविण्यात येत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून रिक्षाच्या भाडे दरवाढीस शासन चालढकल करत आहे. यासाठी तीव्र लढाई करू, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

 

 

आधी डिझेल, पेट्रोल व आता सीएनजी सहा रुपयांनी दरवाढ झाली याचा निषेध करत रिक्षा चालकांनी भाडे वाढीच्या मागणीसाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे लक्ष वेधण्यात आले.

 

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, दिनेश गोटणकर, दिनकर खांडेकर, राजू बोराडे, रामा मोरे, गुरू बडदाळे, हनुमंत शेलार , पप्पू तेली, मनोज यादव, फरीद शेख, कासिम तांबोळी, राजू हांडे, सुखदेव कांबळे आदी उपस्थित होते

 

एकीकडे पेट्रोल,डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत.मात्र प्रवासी भाडे वाढविण्याबाबत प्रशासन कुठलाही निर्णय घेत नाही, वाढवण्यात आलेली तुटपुंजी दरवाढ तीही तेही सध्या सर्वांच्या विरोधामुळे (CNG Price Hike) रद्द केली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना भाडेवाढ समाधानकारक द्यावी, अशी मागणी रिक्षाचालकाकडून करण्यात आली आहे.

 

 

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही व अजूनही देऊ शकले नाहीत.यावर्षी एक एप्रिलला 62.20 दर होता, त्यानंतर 2 एप्रिलला 5.80 रू.12 एप्रिलला 5 रू.28 एप्रिल ला 4.20 रू. 20 मे 2.80, 8जूनला 2 रु.6 जुलैला 3  रू. 3 ऑगस्टला 6 रुपये एवढी मोठ्या प्रमाणात गोरगरिबांवर दरवाढीचा हल्ला झाला आहे. महागाईत (CNG Price Hike) सामान्य नागरिकांनी जगायचे कसे? असा प्रश्न आहे, याकडे एकेकाळी रिक्षा चालवणारे आजचे मुख्यमंत्री लक्ष देतील का? हाच प्रश्न आहे असे नखाते म्हणाले.

 

Rain In Maharashtra : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

 

 

भयानक परिस्थिती केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे याचा परिणाम सर्वसामान्य रिक्षा व टेम्पो, प्रवाशीवाहन चालकावरती झाला. आधीच दरवाढ करून पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर पाच रुपये कमी केल्याचे सांगून मोठी प्रसिद्धी मिळवणारे राज्य सरकार आता रिक्षा चालकांकडे पाहतील काय असा प्रश्न राजू बोराडे यांनी केला आहे. पुढच्या कालावधीमध्ये गॅस दरवाढ कमी नाही झाली आणि रिक्षा चालकांना भाडे दरवाढ मिळाले नाही तर रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशाराही नखाते यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.