-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : सीओईपीमध्ये १५ व १६ फेब्रुवारीला पुणे स्टार्टअप फेस्ट  

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या उद्द्योगशीलतेला बढावा देण्यासाठी व नव नवीन संकल्पनांची माहिती व्हावी. या हेतूने कॉलेज ऑफ इंजिनेरींग पुणे येथे १५ आणि १६ फेब्रुवारीला पुणे स्टार्ट अपचे आयोजन करण्यात आले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

युवा उद्योग मित्रांना नवीन संकल्पनांची माहिती व्हावी. तसेच नव नवीन उद्द्योग तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देश्शाने पुणे स्टार्ट अप फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्द्योगपतींना बोलवून त्यांचे मार्गदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन निम्मिताने करण्यात येते. या वर्षी तंत्रतज्ञान, कृषी विषयक, सामाजिक क्षेत्र, स्वास्थ्य, जीवन शैली ई.  विषयाचे वेगवेगळे सात विभागाचे स्टार्ट अप मध्ये पाहायला मिळणार आहेत. याच बरोबर उद्योग विश्वातील नामवंत व्यक्तींशी चर्चा व माहितीची देवाण घेवाण होणार आहे.

या कार्यक्रमाला काही गुतंवणूकदारांना ही आमंत्रित करण्यात आले आहे. नवीन उद्द्योग करू पाहणाऱ्या तरुणांसाठी पर्वणी असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी ही मिळू शकते. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलच्या निम्मिताने तरुणांना विविध गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच उद्द्योग विश्वातील नामवंत उद्द्योजकांची मते जाणून घ्यायला व  मार्गदर्शन घेण्याची संधी या निम्मिताने उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.