Weather Update: राज्यात पुन्हा थंडीची जाणीव, पुण्याचे तापमान 11.3 अंश सेल्सियस

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रात आज या हिवाळ्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आज किमान तापमान 11.3 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. तर मुंबईतही सांताक्रुझमध्ये 16.9 तर कुलाब्यात 19.8 एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे. नाशिकचं किमान तापमान 12 अंश सेल्सियस नोदवलं गेलं आहे. येत्या 48 तासात मुंबईत गारवा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

IMD चे मुंबई विभागाचे प्रमुख के. एस. घोसाळीकर यांनी Tweet करून मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातल्या तापमानात बदल होणार असल्याची माहिती दिली. होसाळीकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ही कदाचित राज्यासाठी या हंगामातली शेवटची थंडीची लाट असू शकते. त्यामुळे होसाळीकर यांनी लिहिलं आहे की, काळजी घ्या आणि आनंदही घ्या. राज्यात 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पारा एक आकडी असू शकतो. म्हणजे 10 अंशाच्या खालीही जाण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या महिन्याभरात पुण्यात किमान तापमानाची नोंद 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाली नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. गेल्या महिन्यात 28 जानेवारीला किमान तापमान12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. गेल्या 41 वर्षांत पहिल्यांदाच जानेवारीत किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या वर गेला होता.

1980 पासून पुण्यात जानेवारी महिन्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे फक्त 3 वेळा म्हणजेच 1988 मध्ये 10.2, 2007 मध्ये 10.3 आणि 2021 मध्ये 12.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. जानेवारी हा पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. काही वर्षी तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. 1994 मध्ये 4.4, 1997 आणि 2006मध्ये 4.7, 1984 मध्ये 5.1 आणि 2011 मध्ये 5.3 अंश सेल्सिअस इतका पारा नोंदवला गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.