Pimple Saudagar : नाना काटे सोशल फाउंडेशन च्या मूर्तीदान उपक्रमात 12 हजार 300 मूर्तीचे संकलन

एमपीसी  न्यूज –  पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी  नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले

मागील दोन वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन  नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण 12 हजार 300 मूर्ती दान करण्यात आल्या.

मागीलवर्षी या उपक्रमात साडेतीन हजाराहून गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. या मूर्ती श्री फाउडेशन, पुणे यांना देण्यात आल्या त्या मूर्त्यांची नव्याने रंगरंगोटी करून विक्री करण्यात आली, त्यामधून 3 ते 4 लाख रुपये निधी गोळा झाला. या निधीचा वापर अनाथ आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच यावर्षीही 12 ते 13 हजार मूर्ती या उपक्रमातून जमा करण्यात आल्या आहे.यामधून मिळणाऱ्या निधीचा विन्योग गरजू व अनाथ मुलांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करण्यात येणार आहे.

या उपक्रमात नगरसेवक नाना काटे स्वतः विसर्जन घाटावर उपस्थित राहून आवाहन करत होते त्याबरोबर नाना काटे सोशल फाउंडेशन,  विविध संस्था, एमकेअर फार्मा कंपनी, रोटरी  क्लब आदी, संस्थाच्या स्वयंसेवकांनी  भाविकाना मूर्तीदान व निर्माल्य कलशात टाकण्याचे आव्हान करण्यात येत होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.