Pune News : पिरंगुट येथील रक्तदान शिबिरात 90 पिशव्यांचे संकलन

एमपीसी न्यूज : पिरंगुट येथील इलेक्ट्रॉनिका प्लास्टिक मशिन्स, इएमएसटी मार्केटिंग लि. या दोन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उन्मुक्त युवा संगठन, पूना सेरोलोजिकल ब्लड बँक यांच्या सहकार्याने येथील कर्मचारी वर्गासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात 90 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत हे शिबिर यशस्वी केले.

शहरात सध्या रक्ताची चणचण जाणवत आहे. अनेकांनी लस घेतल्याने किंवा मागील एक दोन महिन्यापूर्वी रक्तदान केल्यामुळे नेहमीच्या रक्तदात्यांना रक्तदान करता येत नाहीये अशातच असे शिबिर झाल्यास रक्त पेढ्याना दिलासा मिळतो त्यामुळे जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

हे शिबिर आयोजित करण्यासाठी इपीएमएल आणि इएमएसटीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य रत्नपारखी, अध्यक्ष श्री. अमित पेंडसे , एजीएम ऑपरेशन श्री नरेंद्र राऊळ, असिस्टंट मॅनेजर एच.आर श्री. ललित गुंडावार, गोपाल दास, उन्मुक्त युवा संगठन ची आयटी सेल प्रमुख रुचिरा रणनवरे, आचल लुथरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.