Bhosari News : महाविद्यालयातील नव मतदारांची वोटर हेल्पलाईनद्वारे नोंदणी

एमपीसी न्यूज –  भोसरी विधानसभा मतदार संघातील  महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ कला,वाणिज्य महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे व मॉडर्न हायस्कूल निगडी येथे  व अन्य महाविद्यालयात  नव मतदारांची मतदार यादीत नोंदणी होण्यासाठी शिबिर घेण्यात आले.(Bhosari News) त्या अनुषंगाने महाविद्यालयातील नवं मतदारांची Voter Helpline द्वारे Online व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून घेण्यात आली.

PMPML bus fire : पीएमपीएमएलच्या बसमध्ये आग

शिबिरात विद्यार्थ्यांना 207 भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राणी ताटे, अपर तहसीलदार गीता गायकवाड,  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आण्णा बोदडे, अशोक पाटील, पांडुरंग पवार, सुनील कास्टेवाड यांचे सहकार्य लाभले.(Bhosari News) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.