Aundh : भारतीय सैन्य व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलातील संयुक्त “एकुव्हेरिन” सैन्य युद्ध सराव

एमपीसी न्यूज- भारतीय सैन्य व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलातील संयुक्त सैन्य औंध मिलिटरी स्टेशन येथे 07 ते 20 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ‘एकुव्हेरिन’ या शब्दाचा अर्थ दिवेही भाषेतील ‘मित्र’ आहे. २००९ पासून भारतीय सैन्य व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दले ही दिवेही भाषेत एकेवेरिन म्हणजेच ‘मित्र’ संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आदेशानुसार अर्ध-शहरी वातावरणात दहशतवादविरोधी कारवाई आणि दोन्ही दलांमधील परस्पर संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

या सरावाचे लक्ष केंद्रित बंडखोरी व दहशतवादविरोधी कृती करतांना सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि एकमेकांना परिचालन करण्याच्या कार्यपद्धतीची माहिती देणे यावर आहे. भारत मालदीवशी अतिशय निकटचे वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक व व्यावसायिक संबंध आहेत. आणि या युद्ध सरावामुळे दोन देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.