Combing Operation News: बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन,  44 जण ताब्यात

0

एमपीसी  न्यूज : लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर बुधवार पेठ येथील वेश्यावस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. या भागात सराईत गुन्हेगार व इतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन करून तब्बल 44 जणांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी  हे कॉम्बींग ऑपरेशन करण्यात आले.

बुधवार पेठेतील 7 एन्ट्री व एक्झीट पॉइंटबर नाकाबंदी करण्यात आली. संशयीत व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110, 112, 117 व 122 तसेच सीआरपीसी 151 प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच सध्या दिवाळी सणानिमीत्ताने मोठ्या प्रमाणात बाजारपेठा मध्ये खरेदी साठी नागरीकांची गर्दी होत असल्याने, रस्त्यावरील गुन्हे तसेच गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडू नयेत.

तसेच वेश्यावस्ती मध्ये अल्पवयीन तसेच सज्ञान मुलीकडून जबरदस्तीने  वेश्या व्यवसाय करुन घेतला जातो का ? असल्यास याला प्रतिबंध करण्याच्या सुचना नारनवरे यांनी दिल्या होत्या.

 त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 ते पावणे तीन  वाजण्याच्या सुमारास 28 पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवार पेठेतील अनेक कुंटनखाणे तपासले. या कारवाईत 44 जणांना ताब्यात घेवून, त्यांचे ओळखपत्र, त्यांचे वाहन व गुन्हेगारी रेकॉर्ड यांची पडताळणी करुन, त्याचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III