Comedy Show ‘Gangs Of Filmistan’: विनोदवीर सुनील ग्रोव्हरचे लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक

Comedy Show 'Gangs Of Filmistan': Comedian Sunil Grover's soon comeback on the small screen कपिल शर्मा लवकरच या शोमध्ये पाहुणा म्हणून दिसू शकतो. कपिल आणि सुनील यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता.

एमपीसी न्यूज – एकेकाळी ‘द कपिल शर्मा शो’चा अविभाज्य भाग असलेला विनोदवीर सुनील ग्रोव्हर कपिल शर्माशी झालेल्या मतभेदांमुळे त्या शोमधून बाजूला झाला. विनोदाची उत्तम जाण असलेला हा कलाकार आपल्या वेगळ्या शैलीमुळे खूपच लोकप्रिय झाला होता. आता तो लवकरच ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्मा लवकरच या शोमध्ये पाहुणा म्हणून दिसू शकतो. कपिल आणि सुनील यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते दोघे चर्चेत राहिले होते.

पण आता मात्र या दोघांमधील वाद निवळला आहे. सर्व गोष्टी सुरळीत होताना दिसत आहेत. दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. पण आतापर्यंत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल अशी बातमी आली नव्हती. मात्र आता ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’ या शोचे निर्माते या शोसाठी सर्वोत्तम गोष्टी करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. या शोच्या निर्मात्यांनी या जोडीला एकत्र आणण्याची योजना आखली आहे.

या शोमध्ये शिल्पा शिंदे, उपासना सिंह, डॉ. संकेत भोसले झळकणार आहेत. या सर्वांसोबत सुनील ग्रोव्हरचे शोमध्ये असणे सर्व प्रेक्षकांसाठी नक्कीच एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. हा शो 31 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.