Pune Corona Update : दिलासादायक ! पुण्यात 182 नवे रुग्ण ; 335 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटायला सुरूवात झाली आहे. आज दिवसभरात 182 नवे रुग्ण सापडले, तर 335 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आज 203 जणांची प्रकृती चिंताजनक असून 282 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 5 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 304 इतकी झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 76 हजार 459 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

नागरिकांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना विविध ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावा. हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचेही निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच पॉझिटिव्ह आढळल्यास घरातच विलगीकरण करावे. नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.