India Corona Update : दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट सुधारतोय, सध्या 84.24 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे देशाच्या रिकव्हरी रेट मध्ये सुधारणा होत आहे. देशातील 2 कोटी 07 लाख 95 हजार 335 जण उपचारानंतर बरे झाले असून, रिकव्हरी रेट 84.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 11 हजार 170 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 46 लाख 84 हजार 077 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 62 हजार 437 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 36 लाख 18 हजार 458 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 077 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 70 हजार 284 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 31 कोटी 48 लाख 50 हजार 143 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 32 हजार 950 चाचण्या शनिवारी (दि.15) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 22 लाख 20 हजार 164 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

देशात आज (रविवारी, दि‌.16) सलग सहाव्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, रिकव्हरी रेट सुधारला आहे. देशात नव्यांन वाढ होणा-या रुग्णांच्या संख्येत घट होत असून ही दिलासादायक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.