PMC Water Problem : पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या हद्दीमध्ये (PMC Water Problem) समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील सोसायट्यांना बांधकाम व्यावसायिकाने पाणी दिले पाहिजे. यासंदर्भात बांधकाम परवानगी देत असताना विकासकाने पीएमआरडीएला शपथपत्र दिले आहे. दरम्यान, महापालिकेने सोसायट्यांना पाणी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात शपथपत्र दिले असून पाणी देण्याची जबाबदारी विकासकाची असल्याचे यामध्ये नमुद करण्यात आले आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांना महापालिकेने पाणी पुरवठा करावा यासंदर्भात काही नगरसेवकांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने महापालिकेला 23 गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश दिले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र सोसायट्यांच्या पाणी पुरवठ्या संदर्भात उच्च न्यायालयात शपथपत्र सुध्दा (PMC Water Problem) दाखल करण्यात आहे.

महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बांधकाम व्यावसायिक सोसायट्यांना शपथपत्र देऊन सुध्दा पाणी पुरवठा करत नाहीत. महापालिका आता या सोसायट्यांना करआकारणी करणार असल्यामुळे याभागातील नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून पाण्याची मागणी होत आहे.

Pune News: राज्य सहकारी बँकेला 602 कोटींचा नफा; प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती

महापालिका प्रशासन आता 23 गावांमध्ये सुध्दा समान पाणी पुरवठा (PMC Water Problem) योजना राबवणार असून यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.