Nashik News : पोलीस आयुक्तालयाच्या ‘एक खिडकी’ योजना परवानगीबाबतचे शुध्दीपत्रक जारी

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत असल्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व प्रकराचे मोर्चे, मिरवणूका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभायात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास, क्रिडा विषयक सर्व स्पर्धा, सार्वजनिक व खाजगी ठिकाणी आयोजित करण्यात येणारे मेळावे, रंगभूमी प्रयोग व इतर प्रयोग या सर्व बाबींसाठी पोलीस आयुक्त कार्यालय स्तरावर  एक खिडकी योजनेद्वारे पुर्वपरवानगी घेणेबाबत पोलीस आुयक्त दिपक पांण्डेय यांनी आदेश जारी केले होते.

या शुध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, महापालिकेच्या आस्थापनांमध्ये महापालिकेची परवानगी घेऊन आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना यातून वगळण्यात आले असून अशा कार्यक्रमांना पोलीस परवानगी घेणे बंधनकारक नाही.

परंतु ज्या आस्थापना नाशिक महापालिकेच्या मालकीच्या नाहीत अशा ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांकरिता आयोजकांनी महानगरपालिकेची रितसर परवानगी घेतली असली तरी आयोजकांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय स्तरावरून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलीस आुयक्त दिपक पांण्डेय यांनी  शासकीय आदेशान्वये कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.