Pune : आचारसंहितेपूर्वी सर्व कामे सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी 2019 च्या अखेरीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करावीत, तसेच प्रत्यक्षात कामे सुरू करावीत त्यामुळे आचारसंहिता लागल्यावर विकास कामे थांबणार नाहीत. अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता व सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. 

_MPC_DIR_MPU_II

अंदाजपत्रक सुरू होऊन सहा महिने झाले तरी अजूनही निविदा प्रक्रिया सुरू झाल्या नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मुख्य सभेत करत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकार्‍यांची बैठक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतली. यावेळी आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून निविदा प्रक्रियांची माहिती घेतली. त्यानंतर कामे उशिरा होण्याची कारणे उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यात प्रामुख्याने वर्गीकरण, निविदांसाठी येत नसलेला प्रतिसाद, काही ठराविक ठेकेदारच वेगवेगळे इंटरनेट सुविधा बंद पडण्याची कारणे देण्यात आली.

त्यानंतर आयुक्तांनी या सर्व अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया वेगाने राबविण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस कोणत्याही परिस्थितीत इस्टिमेट करून डिसेंबर 2018 च्या पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण कराण्याचे आदेश दिले. तसेच 25 जानेवारी पूर्वी उद्घाटनाची वाट न पाहता तातडीने कामे सुरू करावीत अशा सूचना केल्या. त्यामुळे एकदा काम सुरू झाल्यानंतर आचारसंहिता सुरू असली तरी ती कामे थांबणार नाहीत अशा सूचना देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.